ANM Recruitment 2020: लॉक डाऊनमध्ये Government Job मिळवण्याची संधी; एएनएम साठी 800 हून अधिक पदांवर होत आहे भरती; जाणून घ्या पात्रता व महत्वाच्या तारखा
कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट आणि लॉक डाऊनमुळे सध्या उद्योगधंदे ठप्प आहेत, व्यवसाय बंद आहेत. अनेकांना आपली नोकरी जाण्याची भीती सतावत आहे. अशात सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्याची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
Sarkari Naukri: कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट आणि लॉक डाऊनमुळे सध्या उद्योगधंदे ठप्प आहेत, व्यवसाय बंद आहेत. अनेकांना आपली नोकरी जाण्याची भीती भेडसावत आहे. अशात सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्याची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. लॉक डाउनमध्येही अनेक सरकारी नोकरीच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे, त्यापैकी एक सरकारी नर्स/एएनएमची (ANM Recruitment 2020) भरती आहे. ही भरती 800 हून अधिक पदांवर होणार आहेत. ही भरती शहरी भागात बाह्य सत्रात लसीकरणासह इतर आरोग्य सुविधा प्रदान करण्यासाठी केली जात आहेत. महत्वाचे म्हणजे यात पुरुष आणि स्त्रिया दोघांचा समावेश असू शकतो.
अशा प्रकारे ज्यांना आरोग्यसेवेमध्ये सरकारी नोकरी हवे आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बाब आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 9 एप्रिल रोजी संपणार होती. परंतु आता सरकारने अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढविली आहे. या नोकरीशी संबंधित पदांची संपूर्ण माहिती, पात्रता, अर्ज करण्यासंबंधी आवश्यक तारखा आणि इतर आवश्यक माहिती आम्ही देत आहोत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख -
सहायक नर्स मिडवाइफरी (ANM) पदासाठी ही भरती होत आहे. अर्जाची अंतिम तारीख 9 एप्रिल 2020 होती, मात्र आता लॉकडाऊन पाहता ही तारीख सरकारने बदलून 30 एप्रिल 2020 केली आहे. म्हणजेच आता इच्छुक उमेदवार 30 एप्रिल पर्यंत अर्ज करू शकतात.
फी भरण्याची शेवटची तारीख देखील 30 एप्रिल 2020 आहे व यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.
एकूण 865 जागांसाठी ही भरती होईल व प्रवर्गनिहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे -
जनरल - 225 पदे
जनरल (महिला) - 122 पदे
ईडब्ल्यूएस - 61 पदे
ईडब्ल्यूएस (महिला) - 25 पदे
एमबीसी - 97 पदे
एमबीसी (महिला) - 58
ओबीसी - 69 पदे
ओबीसी (महिला) - 35 पदे
एससी - 86 पदे
एससी (महिला) - 52 पदे
एसटी - 6 पदे
एसटी (महिला) - 3 पदे
डब्ल्यूबीसी - 26 पदे
फी –
जनरल, ईडब्ल्यूएस, एमबीसी आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 500 रुपये अर्ज फी भरावी लागेल. अनुसूचित जाती, जमाती व महिला उमेदवारांसाठी अर्जाची फी 250 रुपये निश्चित करण्यात आली आहे. फी ऑनलाइन पद्धतीने भरता येते.
वय मर्यादा –
पुरुषांसाठी किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 37 वर्षे. महिलांसाठी किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे. त्याचबरोबर आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना नियमानुसार वयामध्ये सवलतीचा लाभ मिळेल. (हेही वाचा: UPSC परिक्षेसंदर्भात 3 मे रोजी नव्या तारखा जाहीर करण्यात येणार)
शैक्षणिक पात्रता -
मान्यता प्राप्त एएनएम प्रशिक्षण संस्थेकडून एएनएमचे प्रशिक्षण (2 वर्षे पूर्णवेळ डिप्लोमा) असणे गरजेचे आहे. याशिवाय उमेदवाराची नोंदणी बिहार नर्सिंग रजिस्ट्रेशन काउन्सिलमध्येदेखील असणे आवश्यक आहे.
इतर माहितीसाठी http://statehealthsocietybihar.org/ या संकेतस्थळाला भेट द्या
(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2020 05:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

